Ad will apear here
Next
चार नृत्यशैलींनी सजलेला ‘नृत्यसंगम’

पुणे : आफ्रिकन प्रोव्हर्ब, मार्शल आर्ट्स, अंगावर शहारे आणणारं संगीत... पारंपारिक मंगलचरण, गणेशस्तुती आणि त्यातूनच रसिकांच्या मनाला मोहिनी घालणाऱ्या विविध नृत्यशैलींनी रंगला ‘नृत्यसंगम’. सकल ललित कलाघर यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

मेघना राव व निखील परमार यांनी आफ्रिकन प्रोव्हर्ब व मार्शल आर्ट्स यांची सांगड घालताना कंटेपररी या नृत्यशैलीची प्रस्तुती केली. त्यानंतर रसिका गुमास्ते यांनी मंगलाचरण, गणेशस्तुती यावर ओडिसी नृत्यप्रस्तुती केली.


कन्नड कवी पुरंदर दास यांची रचना असलेल्या व भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांनी गायलेल्या ‘भाग्यदा लक्ष्मी’ या अभंगावर धनश्री पोतदार व त्यांच्या विद्यार्थिनींनी कथकद्वारे अभिवादन केले. अरुंधती पटवर्धन व त्यांच्या विद्यार्थीनी यांनी लंकाधिपती रावणाने रचलेली ‘शिवं’ ही शिवस्तुती भरतनाट्यमच्या माध्यमातून प्रस्तुत केली. सर्वच रचनांना उपस्थितांनी भरभरून दाद दिली.        

या कार्यक्रमाला प्रसाद पुरंदरे, माधुरी पुरंदरे यांचे विशेष सहकार्य लाभले. प्रास्ताविक रसिका गुमास्ते यांनी, तर अरुंधती पटवर्धन यांनी उपस्थितांचे आभार मानले. 

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/AZWFCH
Similar Posts
अमेरिकन सरोदवादक केन झुकरमन यांनी उलगडली कारकीर्द पुणे : गिटार वाजवत असताना आणि भारतीय शास्त्रीय संगीताचा गंधही नसताना सरोदने घातलेली भुरळ, प्रथम सतार शिकण्यास केलेली सुरुवात आणि पुन्हा सरोदच्या शिक्षणाकडे वळलेले पाय आणि सरोदलाच वाहून घेण्याचा मनाने घेतलेला निर्णय… अमेरिकेतील प्रख्यात सरोदवादक केन झुकरमन यांनी आपला प्रवास ‘सवाई’च्या ‘अंतरंग’ कार्यक्रमात उलगडला
६५व्या वर्षी मॅरेथॉन जिंकणाऱ्या लता भगवान करेंची संघर्षगाथा चित्रपट रूपात पुणे : एखादी सामान्य व्यक्तीही रोजच्या जगण्याचा संघर्ष करत असताना एखादी अफाट कामगिरी करून जाते आणि सारी दुनिया थक्क होते. अशीच एक प्रकाशझोतात आलेली व्यक्ती म्हणजे ६५ व्या वर्षी अनवाणी पायाने धावून बारामतीतील शरद मॅरेथॉन जिंकणाऱ्या लता करे. त्यांच्या आयुष्यावर ‘लता भगवान करे - एक संघर्षगाथा’ हा चित्रपट
तीन पिढ्यांचा नृत्यसंगम ‘नृत्य धारा’ पुणे : वारसा आणि परंपरेच्या पायावर कथक नृत्यपरंपरा खऱ्या अर्थाने बहरत गेली. पिढीगणिक समृद्ध होत गेलेल्या कथक नृत्यकलेची अनुभूती घेण्याची संधी पुणेकरांना शनिवार, ३० नोव्हेंबर २०१९ रोजी मिळणार आहे. ‘रोटरी क्लब ऑफ पुणे युनिव्हर्सिटी चॅरिटेबल ट्रस्ट’ व ‘मनीषा नृत्यालय’ यांच्यातर्फे ‘नृत्य धारा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे
‘आई कुठे काय करते’ : आईच्या भावविश्वाचा वेध घेणारी नवी मालिका पुणे : व्यापता न येणारं अस्तित्व आणि मोजता न येणारं प्रेम म्हणजे आई. तिच्या निर्व्याज प्रेमाची परतफेड करणं अशक्य आहे. आपल्याआधी तिचा दिवस सुरू होतो. सर्वांच्या आवडी-निवडी, कामाच्या वेळा, थोरामोठ्यांची काळजी आणि घर जपताना स्वत:ला मात्र ती पूर्णपणे विसरते. तसं पाहिलं तर गृहिणीच्या कामाचं आणि तिच्या त्यागाचं कोणतंही मोल नसतं

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language